विद्यालय हे ज्ञानाचे पवित्र मंदिर आहे. कोणत्याही विद्यालयची प्रगती ही त्यातील शालेय व्यवस्थापनावर अवलंबून असते. गांधी विद्यालय शिक्षण संस्था ही अशी एक शिक्षण संस्था आहे की, जी समर्पित सहकाऱ्यांच्या सहयोगातून कार्य करित आहे. महाराष्ट्र हे अनेक समाजसुधारकांची जन्मभूमी आहे. विशेषतः शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणारे अनेक समाजसुधारक महाराष्ट्रात होऊन गेलेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावणे आणि ग्रामीण व शहरी क्षेत्रातील शैक्षणिक दरी कमी करणे हे गांधी विद्यालय शिक्षण संस्थेचे पहिले उद्दीष्ट आहे. आमचा विश्वास आहे की ज्ञान हे अमृत आहे आणि ते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या माध्यमातून देशाचा विकास साधता येतो.
गांधी विद्यालय शिक्षण संस्थेचे संस्थेचे प्रबंध संस्थापक स्व. तुकारामजी मोटघरे हे स्वतः एक शिक्षक होते आणि त्यांनी स्वतः शिक्षणाची गरज समजली होती. ग्रामीण विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, प्रत्येक ग्रामीण विद्यार्थ्यांनी सुशिक्षित, सक्षम व सामर्थ्यवान होऊन सामाजिक दायित्व पूर्ण करावे, या उदात्त हेतूने परिसरातील सेवाभावी लोकांच्या सहकार्याने त्यांनी सन 1956 ला गांधी विद्यालय शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यात कै. श्री. तुकारामजी मोटघरे (अध्यक्ष) स्व. श्री. विस्तारीजी कावडे (उपाध्यक्ष), के. श्री. गणपत पाटील कुरझेकर (उपाध्यक्ष), कै. श्री मोतीरामजी वैरागडे, के. श्री दिनकरराव शब्दे व कै. श्री रामभाऊ उके, यांचे व्यवस्थापक मंडळ निर्माण झाले होते.
गांधी विद्यालय शिक्षण संस्थेची पहिली शाळा 1956 मध्ये कोंढा (कोसरा), तहसील पौनी, जिल्हा भंडारा येथे गांधी विद्यालयाच्या रुपात सुरू करण्यात आली. शालेय शिक्षणाबद्दल ग्रामीण भागातील लोकांचा प्रतिसाद आणि निष्ठा यांचा अनुभव घेऊन स्व. तुकारामजी मोटघरे यांनी दुर्गम खेड्यांमध्ये शैक्षणिक विकासाचे ठोस निर्णय घेतले. भंडारा जिल्हात आणि अनेक ठिकाणी शैक्षणिक अडचणी असूनही त्यांनी गांधी विद्यालय विरली खंदार (1959), पहेला (1963), वलनी (ची) (1963), सावरला (1984), विरली (बुज) (1984) इ ठिकाणी विद्यालयांची स्थापना केली. काही तांत्रिक अडचनींमुळे परसोडी, ब्रह्मी व कोंढा येथिल प्राथमिक शाळा तसेच पौनी येथिल डी. एड कॉलेज बंद करावे लागले.

दि. 16 ऑगस्ट 1993 रोजी के. श्री तुकारामजी मोटघरे यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर व्यवस्थापनात वाद झाला. अशा कठीण परिस्थितीत संस्थेतील प्रत्येक कर्मचाऱ्यांना असुरक्षित वाटू लागले. परंतु सेवानिवृत्त शिक्षक श्री हरिभाऊजी कावळे हे उपाध्यक्ष कै. श्री. विस्तारीजी कावडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते.
दोन वर्षांच्या कालावधीनंतर अॅड. आनंद जिभकाटे (संस्थाध्यक्ष) आणि के. श्री. के. एन. निखाडे (सचिव) यांनी संस्थेच्या उज्ज्वल भविष्याकरिता एकनिष्ठ राहून संस्था समृद्धीस आणली. अॅड. आनंद जिभकाटे हे एक दुरदृष्टी व्यक्तीमत्व असून प्रत्येक शैक्षणिक विकास कार्यात नेहमीच मार्गदर्शन करतात. वाकेश्वरचे मूळ रहिवासी असताना, शालेय जीवनात त्यांनी स्वतः ग्रामीण भागातील सर्व आव्हानांना सामोरे जावे लागले आणि ग्रामस्थांच्या वास्तविक जीवनातील समस्यांशी कसे तोंड दयावे लागते याची त्याना जाणिव होती. एक आदर्श शालेय वातावरण तयार करण्यासाठी आणि शहरी गर्दी ग्रामीण भागांकडे खेचण्यासाठी त्याचे व्यवस्थापन मंडळ कार्य करित आहे.
सध्या गांधी विद्यालय शिक्षण संस्था कोंढा अंतर्गत सर्व सहाही विद्यालये हया प्रगतीपथाकडे वाटचाल करित आहेत. तसेच कोंढा येथील प्रियदर्शनी कॉन्व्हेंट मुळे इंग्रजी शिक्षणाचे दालन खुले झाले. प्रत्येक हिरव्यागार परिसरामध्ये डिजिटल वर्गखोल्या, विस्तीर्ण खेळाची मैदाने, सुसज्ज प्रयोगशाळा आणि ग्रंथालये यासारख्या सुविधांचा संपूर्ण समावेश आहे. शालेय पायाभूत सुविधांचा संस्थेला अभिमान आहे. शहरी भागातील शाळांमध्ये असणाऱ्या सर्व सोई संस्थेच्या विद्यालयात आहेत. गांधी विद्यालय शिक्षण संस्था कोंढा च्या वतीने २१ व्या शतकाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी अध्यक्ष अॅड. आनंद जिभकाटे यांच्या नेतृत्वात ग्रामीण भागाचा विकास होण्यासाठी सर्व मूलभूत आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सोई करण्यासाठी वचनबद्ध आहे.